पूर्ण संख्या समूह अपूर्णांकात किंवा दशांश चिन्हाचा वापर करून दाखविण्याची गरज
नसते. पूर्ण संख्या समूह ऋण असतात. दुसऱ्या शब्दात पूर्ण संख्या समूहात मोजसंख्या
आणि शून्य यांचा समावेश असतो. उदाहरणार्थ 4 , 952 , 0 , 73
पूर्णांक संख्या (Integers)
पूर्णांक संख्यांमध्ये पूर्ण संख्या आणि त्यांच्या विरुद्ध संख्यांचा समावेश असतो.
म्हणूनच पूर्णांक संख्यांमध्ये ऋण संख्यांचा समावेश असतो . उदाहरणार्थ 12 , 0 , -9
, -810
परिमेय संख्या (Rational numbers)
m/n या रूपातील संख्यांना परिमेय संख्या म्हणतात. येथे m व n हे पूर्णांक असतात
परंतु n हा शून्य नसतो. दोन परिमेय संख्यांच्या दरम्यान असंख्य परिमेय संख्या
असतात. 44 , 0.12 , -18/5 , √36
अपरिमेय संख्या(Irrational numbers)
अपरिमेय संख्यांना अपूर्णांकात किंवा दोन पूर्णांक संख्या यामध्ये दाखविता येत
नाही. उदाहरणार्थ -4π , √3 संख्यांच्या प्रकारांचा कसा सहसंबंध दर्शविता येईल ?
(How are the types of number related?)
सराव संच(Practice set)
√5 चा खालीलपैकी कोणत्या संख्यांचा प्रकार आहे?
अ)
पूर्ण संख्या
ब) पूर्णांक संख्या
क) परिमेय संख्या
ड) अपरिमेय संख्या तपासा

0 comments:
Post a Comment